या‌ कर्जाला जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा, कारखान्याला मदत करतो


अकोले – शरद पवार यांनी आज पक्षाला गळती लागलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपात सामील झालेल्या मधुकर पिचड यांच्यावर निशाणा साधला. पिचड यांना अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना चिमटे काढले. पक्ष बदलाची भूमिका राज्यातील जनतेला आवडत नाही. मी अकोल्यात विधानसभेला सभा घेतली, जनतेच्या मनातील त्याचवेळी कळाले होते. जनतेला परिवर्तन हवे होते आणि ते झाल्याचे म्हणत पवारांनी पिचड यांचा अप्रत्यक्षरीत्या समाचार घेतला.

शरद पवार माजी आमदार स्व. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होते. पवारांनी नाव न एकेकाळचे चांगले सहकारी असलेल्या मधुकर पिचड यांना घेता लक्ष्य केले. पवार म्हणाले, माझ्या अगोदर ५ वर्ष अगोदर यशवंत भांगरे विधानसभेत होते. मला ते ज्येष्ठ होते. भांगरे यांचा अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत मोठा सहभाग होता. अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या, पण आमच्या‌ अनेक सहकाऱ्यांच्या एक दीड वर्षापासून अंगात यायला लागले, असल्याचा टोला शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत पिचड यांना लगावला.

पुढे बोलताना पवार म्हणाले, पक्ष बदलाची भूमिका राज्यातील जनतेला आवडत नाही. मी अकोल्यात विधानसभेच्या वेळी सभा घेतली. त्यावेळी जनतेच्या मनातील कळले होते. जनतेला परिवर्तन हवे होते, ते झाले आहे. अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याची माहिती मिळाली. कारखान्यावर २०० कोटींच‌े कर्ज झाले. या‌ कर्जाला जे जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा. शुक्राचार्यांना बाजूला केल्यास कारखाना चालवण्यासाठी‌ सर्व ती मदत मी करतो, अशा शब्दात शरद पवार यांनी पिचड यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.