असे आहेत जगभरातील आगळे वेगळे जॉब

job
आज आम्ही तुम्हाला जगभरातील अशा नोकऱ्यांबाबत सांगणार आहोत. ज्या वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काही ठिकाणी भाड्याचा बॉयफ्रेंड तर काही ठिकाणी शॅम्पेन फेशियल स्पेशालिस्टसारख्या विविध नोकऱ्या आहेत. अशी नोकर भरतीची माहिती वाचल्यानंतर तुम्हालाही अशी नोकरी करावीशी वाटेल. या ठिकाणी ना ऑफिसची आणि ना बॉसची कटकट सहन करावी लागत. पण या विचित्र वाटणाऱ्या आपल्या देशात नाही तर इतर काही देशांमध्ये या नोकऱ्या तुम्हाला सहजपणे मिळू शकतात.

भाड्याचा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड देण्यासाठी ह्युमन टचला सर्वात मोठी हीलिंग पॉवर म्हणून ओळखले जाते. प्रेमाचा स्पर्श देणारा तुमच्याजवळ कोणी नसेल तर अजूनही उशीर झालेला नाही. तुम्ही ८ हजार रुपये तासाला देऊन तुमच्यासाठी प्रेमाचा स्पर्श घेऊ शकता. अनेक कंपन्या अशाप्रकारची सर्व्हिस देत आहेत. तुम्ही ही सुविधा आयुष्यभरासाठीसुद्धा घेऊ शकता.

शॅम्पेन फेशियल स्पेशालिस्ट हा एक रोमांचक जॉब आहे. यामध्ये पार्टीत जाऊन मुलींना शॅम्पेन फेशियल द्यावे लागते. हे शॅम्पेन फेशियल नॉर्थ अमेरिकेतील क्लबमध्ये क्रिरिल बिचुतकस्की नावाचा एक फोटोग्राफर आहे, ज्याने सुरु केले आहे. यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. जर तुम्ही फोटोमध्ये पोझ देण्यासाठी परफेक्ट असाल तर तुम्ही प्रोफेशनल ब्राइडमेड्स हा जॉब करू शकता. यासाठी २० हजारापासून ते १ लाखापर्यंत पैसे दिले जातात.

जर तुम्ही लाईनमध्ये उभे राहून बोर होत नसाल तर प्रोफेशनल लाईन स्टँडर हा जॉब तुमच्यासाठी आहे. तुम्हाला यामध्ये फक्त लाईनमध्ये उभे राहून वाट पाहावी लागते. तुम्हाला आठवड्यात यासाठी ६७ हजार रुपये दिले जातात. अॅप्पल प्रॉडक्टच्या लॉन्चिंगला रांगेत उभे राहणे किंवा एखाद्या मुव्हीसाठी तिकीट रांगेत उभे राहणे असे या जॉबचे स्वरूप आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कंडोम टेस्टरसाठी २०० पेक्षा जास्त ड्युरेक्स कंपनी पोस्ट काढते. यामध्ये एक कंडोम टेस्ट करण्यासाठी ४०२८ रुपये दिले जातात. यामध्ये तुम्हाला कंडोमचा युज करून पाहावा लागतो.

जर तुम्हाला आईस्क्रीम खूप आवडत असेल तर आईस्क्रीम टेस्टर हा जॉब तुमच्यासाठीच आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम टेस्ट करून त्यांना नाव द्यावे लागते. विविध कंपन्या असे जॉब ऑफर करतात. जर तुम्हाला झोपण्यासाठी पैसे भेटत असतील तर यासारखा दुसरा चांगला जॉब असूच शकत नाही. नासा प्रोफेशन स्लीपर्सला हायर करते. या लोकांवर सायंटिफिक रिसर्च केला जातो. यासाठी यांना पगार दिला जातो. वर्षाला ४० लाख रुपये या लोकांना केवळ झोपण्यासाठी दिले जातात.

जलपरी व्हायला कोणाला आवडणार नाही आणि जर तुम्हाला यासाठी पैसे भेटत असतील तर तुम्ही कायमस्वरूपी जलपरी बनून राहण्यास तयार व्हाल. अनेक देशांमध्ये यासाठी ट्रेनिंग दिली जाते. यामध्ये तुम्हाला फिनसोबत पोहावे लागते. मरमेड पार्टी स्विमिंगमध्ये प्रोफेशनल मरमेडला हायर केले जाते. या जॉबमध्ये तुम्हाला नेलपेंटला नाव द्यावे लागते. यामध्ये नवनवीन नेलपेंटला कलरनुसार नाव देऊन तुम्ही या फिल्डमध्ये सक्सेसफुल होऊ शकता.

Leave a Comment