आता कपड्यांना इस्त्री करण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये नव्या प्रकारच्या इस्त्रीचा वापर

iron
लॉन्ड्रीमध्ये इस्त्रीला कपडे देताना नजरेस पडत असे भारी भरकम कोळश्याची इस्त्री. पण ही इस्त्री वापरणे त्रासदायक असे, कारण या इस्त्रीमधील कोळसा, निखारे वारंवार जळते ठेवावे लागत असत. इतकेच नाचे तर कोळश्याचे जळते निखारे कपड्यावर पडून कपडा जळण्याचाहे धोका त्यामध्ये असे. त्यानंतर विजेवर चालण्याऱ्या इस्त्र्या वापरल्या जाऊ लागल्या. पण विजेची इस्त्री वापरण्यामध्ये विजेच्या बिलाचा अतिरिक्त खर्च होऊ लागला. त्या मानाने निव्वळ नफा कमी होऊ लागला. पण आता इस्त्री करण्यासाठी एक नवीन इस्त्री बाजामध्ये उपलब्ध झाली असून, या इस्त्रीचा वापर लॉन्ड्रीमध्ये केला जाऊ लागला आहे.
iron1
आता इस्त्रीवाले स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी सिलेंडरचा वापर करून कपड्यांना इस्त्री करू लागले आहेत. या साठी एलपीजीवर चालू शकणारी इस्त्री बाजारामध्ये आणली गेली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या इस्त्रीची तीन मॉडेल्स बाजारामध्ये आणली आहेत. यांची किंमत २५०० रुपयांपासून ७००० रुपयांपर्यंत आहे. ही इस्त्री ‘इको फ्रेंडली’ कारण यामध्ये विजेचा वापर नाही, शिवाय यापासून कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा हानिकारक वायू निर्माण होत नाहीत.
iron2
लोखंडाने बनलेल्या या इस्त्रीमध्ये एक नळी जोडलेली आहे. ही नळी रेग्युलेटरला जोडून हा रेग्युलेटर सिलेंडरला जोडला जातो. या नळीतून निर्माण होणारा विस्तव इस्त्रीच्या आतमध्ये निर्माण होत असून, या विस्तवामुळे इस्त्री गरम होते. तसेच इस्त्रीचे तापमान नियंत्रित करण्यासाठी एक स्वीचही या इस्त्रीमध्ये दिला गेला आहे. ही इस्त्री ऑनलाईनही खरेदी केली जाऊ शकते. एलपीजी वर चालणारी ही इस्त्री वजनाला काहीशी जड आहे. साडेसहा किलो वजनाची ही इस्त्री पाच किलो एलपीजी सिलेंडरच्या सहाय्याने ११०० कपड्यांना इस्त्री केली जाऊ शकते, तर १९ किलो वजनाच्या एलपीजीच्या सहाय्याने ४५०० कपड्यांना इस्त्री केली जाऊ शकते.

Leave a Comment