व्हिडीओ; मेवेदरच्या घरी ट्रक भर-भरून येतो पैसा

Floyd-Mayweather
४१७१ कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक असलेला अल्टीमेट फायटिंगचे अनडिसप्यूटेड किंग फ्लॉयड मेवेदरला अनेकदा बॅंकेतून नोटा आणण्यासाठी ट्रकचा वापर करावा लागतो. आपल्या बॅंक बॅलन्स आणि कॅशबाबत मेवेदरला खूपच प्रेम आहे. तसेच आपल्याला त्याचा खर्चही एवढा आहे ऐकून धक्का बसेल. एकदा खर्चासाठी तो कोट्यावधी रुपये काढतो. तो कॅशबाबत एवढा क्रेजी आहे की, तो कोट्यावधी रूपयांची कॅश आपल्या आसपास पसरून ठेवतो.

मेवेदर जेवत असो की कार चालवत असो, विमानात प्रवास करो की बेडवर झोपो ते नेहमीच जवळ करोडोंची कॅश जवळ ठेवतो. अनेकदा स्ट्रिप क्लबमध्ये लाखों डॉलर उडवून येतो. अशा कृत्यामुळे लोक त्याला सनकीही म्हणतात. २६ ऑगस्ट रोजी अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (यूएफसी)चा बादशाह कोनोर मॅक्ग्रिगोरसोबत मेवेदरची पुढची फाईट होईल. १२ राउंडपर्यंत चालणा-या ही लढत मागील फाईटपेक्षा जास्त महागडी लढत आहे. यावेळी ११६१ कोटी रुपयेंचा डाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लढतीचा निकाल काहीही लागला तरी मेवेदरला ६४५ कोटी रुपये आणि मॅक्ग्रिगोरला ५१६ कोटी रुपये मिळणार आहेत.

Leave a Comment