पोटातील गॅसेस दूर करण्यासाठी ‘वंडर स्पाईसेस’

gas
अनेकदा पचण्यास जड पदार्थ खाल्ले गेल्यानंतर पोटामध्ये गॅसेस होतात, आणि परिणामी पोट फुगते, दुखू लागते. काही वेळा ही समस्या इतकी जास्त सतावू लागते, की शेवटी डॉक्टरांकडे धाव घेण्याची वेळ येते. जर या समस्येवर वेळीच उपचार केले नाहीत, तर ही समस्या हाताबाहेर जाण्यास वेळ लगत नाही. त्यामुळे पोटातील गॅसेसची समस्या उद्भविताच त्यावर उपाययोजना केली जाणे आवश्यक आहे. यासाठी अनेक घरगुती उपायांचा अवलंबही करता येऊ शकतो.
gas1
दालचिनीला ‘ वंडर स्पाईस ‘ म्हटले गेले आहे. दालचिनी भोजनाचा स्वाद वाढवितेच, पण त्याशिवाय पोटातील गॅसेस पासून आराम देण्यामध्येही दालचिनी सहायक आहे. यासाठी एक चमचा दालचिनीची पूड थोड्या गरम पाण्यामध्ये मिसळून त्याचे सेवन करावे. आवडत असल्यास या मधे स्वादासाठी मधही घातला जाऊ शकतो. पोटातील गॅसेसवर आले देखील उपयुक्त आहे. यासाठी आल्याचा कीस, बडीशेप, आणि थोडे वेलदोड्याचे दाणे एकत्र करून पाण्यामध्ये मिसळावे. त्यासोबत चिमुटभर हिंगही पाण्यामध्ये घालावा. हे पाणी दिवसभरातून अनेक वेळी थोडे थोडे पीत राहावे.
gas2
लिंबू आणि सोडा यांचे मिश्रण गॅसेसच्या समस्येवर उपयुक्त आहे. एका लिंबाचा रस थोड्या बेकिंग सोडा मध्ये मिसळून त्यामध्ये पाणी मिसळावे आणि वरून आणखी थोडा सोडा घालावा. हे मिश्रण चांगले ढवळून घेऊन याचे सावकाश सेवन करावे. लसूणामध्ये असलेली तत्वे ही गॅसेस दूर करण्यासाठी सहायक आहेत. यासाठी थोड्या पाण्यामध्ये काही लसूण पाकळ्या उकळून घ्याव्यात. या पाण्यामध्ये थोडी काळी मिरीची पूड आणि अर्धा चमचे जिरे पाणी उकळताना घालावेत. हे पाणी उकळून घेऊन नंतर गाळून घ्यावे, व थंड झाल्यावर या पाण्याचे सेवन करावे. दिवसातून दोन तीन वेळेला या पाण्याचे सेवन केल्याने लवकर आराम पडतो. तसेच पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये हिंग मिसळून घेतल्याने देखील गॅसेस दूर होतात. हिंगाचा स्वाद आवडत नसल्यास, तो पाण्याबरोबर किंवा ताकाबरोबर न घेता नुसता पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट पोटावर चोळल्याने ही आराम पडतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment