इंडोनेशियाची संस्कृतीच बनली आहे धूम्रपान; येथील 2-3 वर्षांची मुलेही ओढतात सिगारेट

smoking1
धूम्रपान करणा-या लोकांची संख्या एकीकडे पश्चिमी देशांत कमी होत असतानाच दुसरीकडे धूम्रपान करणा-या लोकांच्या संख्येत इंडोनेशियासारख्या देशात मोठी वाढ होत आहे. इंडोनेशियामध्ये ६० टक्के पुरुष नियमित धूम्रपान आणि तंबाखूचा वापर करतात. यात २ ते ८ वर्षे वयाची लहान मुलेदेखील यात ओढली गेली आहेत. कॅनडाच्या एका फोटोग्राफरने यावर आधारित एक डॉक्युमेंट्री बनविली असून मिशेलच्या म्हणण्यानुसार, धूम्रपान जणू काही इंडोनेशियाची संस्कृतीच बनली आहे.
smoking
जणू काही तंबाखूचा वापर इंडोनेशियाची संस्कृती, राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा भाग बनला आहे. प्रत्येक १० पावलावर येथे तुम्हाला धूम्रपान करणारे लोक आणि तंबाखूची जाहिरात पाहायला मिळेल. येथील १० पैकी ३ घरे बीडी-सिगरेट बनविण्याच्या व्यवसायात जोडली आहेत. तंबाखू इंडस्ट्रीवर इंडोनेशियाची अर्थव्यवस्था निर्भर असून ज्यातून मोठा फायदा होतो. तंबाखूची शेती करून येथील एक मोठा वर्ग आपले जीवन चालवतो आणि आपले लहानपण सिगरेटच्या धुरात घालवतो. जगापेक्षा फारच वेगळे धूम्रपानाबाबत तेथे नियम आहेत. सार्वजनिक ठिकाणी किंवा शाळेत मुले सिगरेट ओढताना सहज दिसून येतात.
smoking2
तंबाखू इंडस्ट्रीचे नियंत्रण येथील सरकारला सोपे नाही. कारण तसेच केल्यास कमाईचे मोठे साधन बंद होईल. मिशेलने सांगितले की, आता तेथे अशी स्थिती आहे की, तेथील लोकांसाठी आणि संस्कृतीसाठी धूम्रपान धोका ठरू लागले आहे. याचे बळी मुलेही पडत चालली आहेत व त्यांचे बालपण व निरागसपणा हरवला आहे. प्रौढ लोकांसारखी ते सिगरेट पितात. यातील दोन ते ८ वर्षे वयाची मुलांचाही समावेश आहे. दिवसभरात जे सिगरेटची दोन दोन पाकिटे संपवितात. धक्कादायक बाब म्हणजे ही मुले आपल्या आई-वडिलांसमवेत हे सर्व करतात आणि त्यांचे पालक त्यांना रोखत नाहीत की त्यांना काहीही आक्षेप नसतो.

Leave a Comment