अतिप्रमाणात प्रथिनांचे सेवन ठरू शकते अपायकारक


प्रथिने आपल्या आहाराचा आणि शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असा महत्वाचा घटक आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. वजन वाढविण्यासाठी, स्नायूंना बळकटी मिळविण्यासाठी, तसेच त्वचेचे, केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारामध्ये प्रथिने असणे आवश्यक असते. आपल्या शरीराला दररोज आपल्या दैनंदिन आहारामधून २०-३० ग्राम प्रथिने मिळायला हवीत. तसेच आपले वय, वजन आणि आपण करीत असलेले शारीरिक श्रम किती आहेत, यावरही आपल्या शरीराची प्रथिनांची गरज अवलंबून असते. मात्र आवश्यकते पेक्षा अधिक प्रमाणामध्ये प्रथिने घेतली जात असल्यास, त्याचे दुष्परिणाम दिसून येणे शक्य असते.

जर आहारामध्ये प्रथिनांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूप जास्त असली, तर बद्धकोष्ठता उद्भवू शकते. शरीरामध्ये प्रथिने जास्त आणि फायबरची मात्र कमी असली, पचनाशी निगडित विकार उद्भवू शकतात व त्यामुळे पचनतंत्र बिघडते. अत्यधिक प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्याने डीहायड्रेशन होण्याचीही शक्यता असते. तसेच वारंवार लघवीची भावना होण्याची तक्रार उद्भवू शकते. त्यामुळे प्रथिनांच्या सोबत इतर पोषक तत्वे ही शरीराला मिळतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आहारामध्ये भाज्या, फळे यांचा समावेश अवश्य करावा.

जर शरीराला इतर आवश्यक पोषक तत्वे मिळाली नाहीत, तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात. केस गळणे, त्वचा निस्तेज होणे, हाडे कमकुवत होणे, सांधेदुखी, अश्या तक्रारी सुरु होतात. त्यामुळे आहारातून प्रथिने मिळविताना इतर पोषक तत्वे, म्हणजेच क्षार, जीवनसत्वे, कॅल्शियम, आणि कर्बोदके इत्यादी आपल्या शरीराला आवश्यकते प्रमाणे मिळतील याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment