सैफ अली खानच्या ‘तांडव’चा टीझर रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या अभिनेता सैफ अली खानची आगामी वेबसिरीज ‘तांडव’ भेटीला येणार आहे. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरीज रिलीज होणार आहे. राजकारणावर आधारित ‘तांडव’ ही वेबसिरीज असून त्याची निर्मिती अली अब्बास जफरने केली आहे. या सिरीजचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘तांडव’ या वेबसिरीजचा टीझर चर्चेत आहे. या एक मिनिटाच्या टीझरमध्ये सैफ अली खान हा एका राजकीय नेत्याची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. सैफचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही वेबसिरीज ९ भागांची असणार आहे. सैफ अली खानसोबत त्यात डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार दिसणार आहेत.

डिंपल कपाडिया या सिरीजच्या माध्यमातून अली अब्बास जफर यांच्यासोबतच डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहेत. तसेच अभिनेता सैफ अली खान, झीशान अय्यूब आणि सुनील ग्रोव्हर या सिरीजमध्ये एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. १५ जानेवारी २०२१ला ‘तांडव’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.