हे हिंदू गद्दार आहेत… युवराज सिंगच्या वडिलांचे वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. योगराज सिंग शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेतकरी आंदोलनादरम्यान पोहोचले होते. पण त्यांनी यावेळी हिंदूंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात योगराज सिंग यांचे एक भाषण व्हायरल होत आहे. ते त्यामध्ये हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. अनेकांनी या वक्तव्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्याचबरोबर ट्विटरवर सध्या ‘Arrest Yograj Singh’ हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.


योगराज सिंग यांचे हे भाषण नींदनीय, अपमानजनक आणि घृणा आणणारे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. योगराज सिंग हे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पंजाबी भाषेत बोलत आहे. यादरम्यान हिंदूंसाठी त्यांनी गद्दार या शब्दाचाही वापर केला. हे हिंदू गद्दार असून त्यांनी शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केल्याचेही ते यात म्हणताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी महिलांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.