कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या भाजप नेत्यालाच झाला कोरोना


चंदीगड – कोरोनासंदर्भातील एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. कोरोना प्रतिबंधक लस कोवॅक्सिनचा ट्रायल डोस घेतलेल्या हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली असून यासंदर्भातील माहिती स्वतः त्यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी महिन्याभरापूर्वी कोवॅक्सिनचा ट्रायल डोस घेतला होता. त्यानंतर देखील विज कोरोनाबाधित निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विज यांनी कोरोना झाल्याचे कळल्यानंतर ट्विट करून माहिती दिली. अंबाला येथील छावणीमधील शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तसेच विज यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले आहे.

कोरोनाची लागण हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ट्विट करून स्वतः त्यांनी याची माहिती दिली. पण लस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या अनिल विज हे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये सहभागी झाले होते. महिनाभरापूर्वी कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी विज यांनी स्वतःचे नाव दिले होते. त्यांनी रोहतकमध्ये लसीचा डोस घेतला होता.