केंद्र सरकारची 14 डेटिंग अॅप्ससह 43 मोबाइल अॅप्सवर बंदी


नवी दिल्ली – मंगळवारी 43 मोबाइल अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घातली. केंद्राने ही कारवाई इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट 69A अंतर्गत केली असून भारताच्या सार्वभौमत्व, ऐक्य आणि सुरक्षेसाठी ही अॅप्स धोकादायक असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. बंदी घातलेल्या 43 अॅप्समध्ये 14 डेटिंग, 8 गेमिंग, 6 बिझनेस/ फायनांस आणि एका एंटरटेनमेंट अॅपचा समावेश आहे. मागील 148 दिवसांत केंद्र सरकारने 267 अॅप्सवर बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने चीनी अॅप टीक-टॉकवर बंदी घातल्यानंतर आता पॉपुलर चॅट अॅप स्नॅक व्हिडिओवरही बंदी घातली आहे. हे सिंगापुर बेस्ड चायनीज सॉफ्टवेअर कंपनी आहे. 10 कोटींपेक्षा जास्त यूजर्स या अॅपचे आहेत. टीक-टॉक बॅन झाल्यानंतर या अॅपचे अवघ्या 2 महीन्यात 5 कोटींपेक्षा जास्त यूजर्स झाले होते. यातील सर्वाधिक यूजर्स भारतातील होते.

आतापर्यंत चारवेळा अॅप्सवर सरकारने कारवाई केली आहे. 29 जूनला पहिल्यांदा 59 चीनी अॅप्स बॅन करण्यात आले होते. ही कारवाई गलवानमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीनंतर करण्यात आली होती. यानंतर 47 अॅप्स 27 जुलैला बंद करण्यात आले. ही कारवाई लडाखमध्ये तणाव वाढल्यानंतर करण्यात आली. यानंतर सरकारने 2 सप्टेंबरला पबजीसह 118 अॅप्स बॅन केले. त्यानंतर आता परत एकदा सरकारने अॅप्सवर कारवाई केली आहे. इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या गृह मंत्रालयला पाठवलेल्या रिपोर्टच्या आधारावर केंद्राने हा निर्णय घेतला.

सरकारने या 43 अॅप्सवर बंदी घातली आहे

1. अली सप्लायर्स

2. अली बाबा वर्कबेंच

3. अली एक्सप्रेस- स्मार्टर शॉपिंग, बेटर लिविंग

4. अलीपे कॅशियर

5. लालामोव इंडिया- डिलीवरी अॅप

6. ड्राइव विद लालामोव इंडिया

7. स्नॅक व्हिडिओ

8. कॅमकार्ड- बिजनेस कार्ड रीडर

9. कॅम कार्ड- BCR (वेस्टर्न)

10. सोल- फॉलो द सोल टु फाइंड यू

11. चायनीज सोशल- फ्री ऑनलाइन डेटिंग वीडियो अॅप अँड चॅट

12. डेट इन एशिया- डेटिंग अॅड चैट फॉर एशियन सिंगल्स

13. वी डेट- डेटिंग अॅप

14. फ्री डेटिंग अॅप- सिंगल, स्टार्ट योर डेट

15. एडोर अॅप

16. ट्रूली चायनीज- डेटिंग अॅप

17. ट्रूली एशियन- डेटिंग अॅप

18. चायना लव- डेटिंग अॅप फॉर चायनीज सिंगल्स

19. डेट माई एज- चॅट, मीट, डेट

20. एशियन डेट

21. फ्लर्ट विश

22. गाइज ओनली

23. ट्यूबिट

24. वी वर्क चायना

25. फर्स्ट लव लाइव – सुपर हॉट लाइव ब्यूटीज लाइव ऑनलाइन

26. रेला – लेस्बियन सोशल नेटवर्क

27. कॅशियर वॉलेट

28. मँगो टीवी

29. एमजी टीवी – ह्यूमन टीवी ऑफिशियल टीवी अॅप

30. वी टीवी – टीवी व्हर्जन

31. वी टीवी – सी ड्रामा के ड्रामा अँड मोर

32. वी टीवी लाइट

33. लकी लाइव- लाइव व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप

34. टाओवाओ लाइव्ह

35. डिंग टॉक

36. आइडेंटिटी वी

37 . आयसोलँड 2 : ऐशेज ऑफ टाइम

38. बॉक्सस्टार (अर्ली एक्सेस)

39. हीरोज इवोल्वड

40. हॅप्पी फिश

41. जेलिपॉप मॅच : डेकोरेट यूअर ड्रीम आइसलँड

42. मंचकिन मॅच : मॅजिक होम बिल्डिंग

43. कॉनक्विस्ता