अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्बमधील पहिले गाणे तुमच्या भेटीला!


बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुक आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केल्यानंतर आता चित्रपटातील पहिले गाणे बुर्ज खलीफा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अक्षय-कियारा यांची केमिस्ट्री यात पाहायला मिळत आहे. उडत्या चालीचे हे गाणे ठेका ठरायला लावते.

दुबई मधील सुंदर ठिकाणी बुर्ज खलीफा हे गाणे शूट करण्यात आले असून शशि-डीजे खुशी यांनी हे गाणे गायले आणि संगीतबद्ध केले आहे. तर हे गाणे गगन आहुजा यांनी लिहिले आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती आणि ट्रेलर भेटीला आल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर 9 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘मुनी 2: कंचना’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक असून हा चित्रपट राघव लॉरेंस यांनी दिग्दर्शित केला आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट 22 मे रोजी रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे प्रदर्शन लांबले. हा चित्रपट आता 9 नोव्हेंबर 2020 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार रिलीज करण्यात येणार आहे.