अमेरिकेतील वैज्ञानिकांनी विकसित केले कोरोनाला नष्ट करण्याचे नवे तंत्र


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अमेरिकेतील वैज्ञानिकांनी एक नवीन तंत्र विकसित केले आहे. कोरोनाचा प्रसार करणारे खास प्रोटीन या नवीन तंत्रामुळे ब्लॉक होते. कोरोनाने शरीरात प्रवेश केल्यानंतर प्रोटीन इम्यून सिस्टीमचे महत्वपूर्ण भाग खराब होतात. कोरोनाच्या पेशींना वाढण्यापासून या नवीन तंत्राने रोखता येऊ शकते. याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे संशोधन कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी औषध तयार करण्यासाठी परिणामकारक ठरेल. जर्नल साइंसमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.

या प्रक्रियेसाठी दोन अणूंचा वैज्ञानिकांनी विकास केला होता. जे कोरोना व्हायरसद्वारे वापरल्या जात असलेल्या सीजर एंजाइम्सना रोखतात. SARS-CoV-2-PLpro असे याला म्हणतात. SARS-CoV-2-PLpro व्हायरल आणि ह्यूमन प्रोटीन्स दोन्हींना वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. याबाबत माहिती देताना हेल्थ सायंस सेंटरमधील बायोकेमेस्ट्री आणि स्ट्रक्चरल बायोलॉजीचे साहाय्यक प्राध्यापक ऑल्सन यांनी सांगितले की, हे एंजाइम्स प्रोटीन्स रिलिजना प्रोत्साहित करतात. त्यामुळे व्हायरस रेप्लिकेट करण्यास मदत मिळते.

प्रोफेसर ऑल्सन यांनी सांगितले की, सायटोकाइंस आणि किमोकाइंससारख्या अणूंना हा एंजाइम बाधित करतो. जे इम्यून सिस्टीमला इंफेक्शन करण्याचे संकेत देतात. ‘SARS-CoV-2-PLpro साधारणपणे यूबिक्टिन आणि ISG15 ह्यूमन प्रोटीन्सची चेन कापून टाकतात, असे तंत्र संशोधकांनी विकसित केले आहे. ज्याद्वारे SARS-CoV-2-PLpro ला वाढण्यापासून रोखता येऊ शकतो. यामुळे मानवी प्रोटीन्सशी मिळत्या जुळत्या असलेल्या प्रोटीन्सची ओळख होते. फक्त व्हायरल एंजाईम्स नाही तर समान कार्य असलेल्या ह्यूमन एंजाईमला रोखता येऊ शकते.