मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे अभिनेत्री कंगना राणावतला चांगलेच महागात पडले आहे. राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूड कलाकारापर्यंत अनेक क्षेत्रातील व्यक्ती कंगनावर सडकून टीका करत आहेत. टीका करणाऱ्याला प्रत्येकाला कंगना प्रत्युत्तर देखील देत आहे. यातच आता कंगनाने आपण लवकरच मुंबईत येणार असून, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवून दाखवावे, असे खुले आव्हानच दिले आहे.
‘या’ तारखेला मुंबईत येणार, कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा , कंगनाचे खुले आव्हान
सोनू सूदनेही आवळला कंगनाविरोधात राग
अनेकांनी कंगनाला तिच्या वक्तव्याबाबत मुंबईत पुन्हा येऊ नकोस, असे म्हटले होते. यावर आता उत्तर देताना कंगनाने ट्विट केले की, मी बघत आहे की अनेक लोक मला मुंबईत परत न येण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ठरवले आहे की 9 सप्टेंबरला मुंबईला येणार आहे.
आता मनसे देखील कंगनाविरोधात आक्रमक
मुंबई परतू नकोस असे म्हणणाऱ्यांना खुले आव्हान देत कंगना म्हणाली की, मी मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर वेळ देखील सांगेल. कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला थांबवून दाखवावे.
“ताई, राजकारण करायचे असेल, ते आपल्या गावाला जाऊन करा”
दुसरीकडे कंगनाच्या या ट्विटबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, मी तिच्या ट्विटवर काहीही म्हणणार नाही व तिच्या सारखी भाषा देखील वापरणार नाही. मी महिलांचा आदर करतो. कंगनाने मुंबई पोलिसांचा अपमान केला आहे. पोलिसांवर केलेले विधान चुकीचे आहे. ही तर मेंटल केस आहे.