शरद पवारांच्या ताफ्यातील दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दोघेही जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान शरद पवारांच्या संपर्कात यापैकी कुणीही नव्हते अशी देखील माहिती मिळत आहे.

सिल्व्हर ओकवरील हे दोन सुरक्षा कर्मचारी रॅपिड टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवारांच्या पीएंचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान हे सुरक्षा रक्षक कराड दौऱ्यानंतर पॉझिटीव्ह आढळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री बाळासाहेब पाटील पण त्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह काल पुण्याला गेले होते. त्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईला आल्याची माहिती आहे.