संसदेच्या स्टॅंडींग कमिटीवर महाराष्ट्राचा झेंडा


नवी दिल्ली – राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची संसदेच्या स्टॅंडींग कमिटीवर नियुक्ती करण्यात आली असून त्यात संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर शरद पवार यांची सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. तर उदयनराजे भोसले यांची रेल्वे, तर रंजन गोगोई यांची परराष्ट्र विषयक कमिटीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

तर मनुष्यबळ विकास संसदीय कमिटीवर चेअरमन म्हणून खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. तर चीन आणि पाकिस्तानसोबत संघर्ष होत असल्यामुळे संरक्षण समितीकडे देशाचे लक्ष असणार आहे. या दोन्ही समित्यांवर मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संसदेच्या स्टॅंडींग कमिटीवर कोणाची नियुक्ती :

  • शरद पवार : डिफेन्स कमिटी
  • उदयनराजे भोसले : रेल्वे कमिटी
  • रंजन गोगोई : परराष्ट्र विषयक कमिटी
  • विनय सहस्त्रबुद्धे : एचआरडी, चेअरमन.
  • प्रियंका चतुर्वेदी : कॉमर्स कमिटी
  • डॉ. भगवान कराड : पेट्रोलियम कमिटी
  • ज्योतिरादित्य सिंधिया : एचआरडी कमिटी
  • राजीव सातव : डिफेन्स कमिटी