जाणून घ्या IMEI नंबरवरून चोरीला गेलेला मोबाइल शोधण्याची सोप्पी पद्धत

स्मार्टफोन आज आपल्या दैनंदिन जीवनातील मोठा भाग झाला आहे. प्रत्येक गोष्ट आपण मोबाईलच्या माध्यमातून करत असतो. मात्र जर फोन हरवला अथवा चोरी झाल्यास, मोठी समस्या निर्माण होते. फोन शोधणे अवघड काम असते. मात्र तुम्ही आयएमईआयच्या (इंटरनेशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) मदतीने चोरी झालेला फोन शोधू शकता.

Image Credited – SMEX

आयएमईआय नंबरद्वारे मोबाईल शोधण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे मोबाईल अ‍ॅप आहे. एका मोबाईल अ‍ॅपमध्ये तुम्ही तुमच्या फोनचा आयएमईआय नंबर टाकून फोनला ट्रॅक करू शकता. खास गोष्ट म्हणजे तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड, इंटरनेट एक्सेस आणि जीपीएस लोकेशन नसले तरीही तुम्ही याद्वारे फोन शोधू शकता. आयएमईआय हा 15 आकडी नंबर तुम्हाला फोनमध्ये तर मिळतोच, सोबतच फोनच्या बॉक्सवर देखील दिसेल.

Image Credited – Text Message Spy

मोबाईलचा आयएमईआय नंबर सापडल्यानंतर दुसऱ्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोरवरून आयएमईआय फोन ट्रॅकर अ‍ॅप इंस्टॉल करा. अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर आयएमईआय नंबर टाकून सर्च करा. यानंतर एका मेसेजद्वारे फोनच्या लोकेशनची माहिती मिळेल.

फोन चोरीला गेल्यास तुम्ही पोलिसात देखील तक्रार करणे गरजेचे आहे. कारण पोलीस देखील आयएमईआय नंबरद्वारेच फोन ट्रॅक करते. एक गोष्ट लक्षात ठेवा की फोन खरेदी केल्यानंतर आयएमईआय नंबर सुरक्षित लिहून ठेवा.

Loading RSS Feed