सुशांतच्या ‘दिल बेचारा’च्या टायटल साँगचा टीझर रिलीज


बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘दिल बेचारा’ 24 जुलैला डिस्ने हॉट स्टार प्लसवर रिलीज होणार आहे. त्यातच आता या चित्रपटाचे टायटल साँगचा टीझर नुकताच डिस्ने हॉट स्टारने इन्स्टाग्रामवर रिलीज केला आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये सुशांतची एन्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. या गाण्याच्या टीझरला सध्या सोशल मीडियात चांगलीच पसंती मिळत आहे.


दरम्यान सुशांतचा शेवटचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत असलेल्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही काळात या ट्रेलरला विक्रमी व्ह्युज मिळाले असून कमी कालावधीत सर्वाधिक व्ह्युज मिळविणारा या चित्रपटाचा ट्रेलर ठरला. चित्रपटात किझी आणि मॅनी यांची प्रेमकथा थोडक्यात प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून उलगडण्यात आली आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचे तिच्यावर खूप प्रेम आहे. पण ही प्रेमकथा सामान्य नाही, यात अनेक चढउतार दाखवण्यात येणार आहे.

Leave a Comment