भारत-अमेरिका करणार कोरोना प्रतिबंधक आयुर्वेदिक औषधांचे क्लिनिकल ट्रायल

अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजीत सिंह संधू यांनी कोरोना व्हायरसवर भारत-अमेरिकेतील आयुर्वेदिक डॉक्टर आणि संशोधक संयुक्तपणे आयुर्वेदिक औषदांची क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. प्रतिष्ठित भारती-अमेरिकन वैज्ञानिक, विद्वान आणि डॉक्टरांच्या समुहाशी बोलताना संधू म्हणाले की, संस्थात्मक भागीदारीच्या विस्तृत नेटवर्कद्वारे कोव्हिड -19 विरोधीतल लढ्यात दोन्ही देशांचे वैज्ञानिक एकत्र आले आहेत.

संधू म्हणाले की, संस्था संयुक्तरित्या संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी एक आल्या आहेत. दोन्ही देशातील आयुर्वेदिक डॉक्टर आणि संशोधक कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यात आयुर्वेदिक औषधांच्या संयुक्त क्लिनिकल चाचणीसाठी एकत्र येण्याचा विचार करत आहेत. वैज्ञानिक माहिती आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करत आहेत.

ते म्हणाले की, भारतीय औषध कंपन्या स्वस्त औषध आणि लस बनवण्यामध्ये पुढे आहेत व या महामारीच्या लढाईत देखील महत्त्वाची भूमिका बजावतील. अमेकितेतील संस्थेंसोबत भारतीय औषध कंपन्यांचे कमीत कमी तीन करार झाले आहेत.

Leave a Comment