VIDEO ; व्हायरल होत आहे दीपिकाने सुशांतच्या अभिनयाबद्दल केलेले वक्तव्य


मागच्या रविवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या मुंबईमधील वांद्रे येथील राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या अचानक एक्झिटमुळे सिनेसृष्टीसह सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर नेपोटिझमचा वाद उभा राहिला आणि त्यानंतर सुशांतचे अनेक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच दीपिकाचा सुद्धा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दीपिकाने सुशांतच्या अभिनयाबाबत आपले मत व्यक्त केले आहे.


हा व्हिडीओ सुशांतच्या फॅनपेजवरून शेअर केला आहे. दीपिकाच्या एका जुन्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे. जिथे तिला परफॉर्मन्ससाठी तू कोणत्या अभिनेत्याला सर्वाधिक रेटिंग देशील असे विचारण्यात आले होते. त्यावर सुशांतचे नाव घेत दीपिका म्हणते मला सुशांत सिंह राजपूतचा अभिनय खूप आवडतो.

2017 मध्ये आलेल्या सुशांतच्या राब्ता चित्रपटात दीपिकाने एक आयटम साँग केले होते. या चित्रपटात कृती सेनन आणि सुशांत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याचबरोबर दीपिका अनेकदा सुशांतसोबत पार्टीमध्ये पोझ देताना दिसली होती. सुशांतने त्याच्या छोट्या करिअरच्या काळात सुद्धा स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख तयार केली होती.

Leave a Comment