सप्टेंबर महिन्यात ‘एमपीएससी’ची परीक्षा; वेळापत्रक जाहीर


मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले असून राज्यसेवा पूर्व परीक्षा या वेळापत्रकानुसार १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) काही दिवसांपूर्वी ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केल्यामुळे राज्यभरातील उमेदवारांकडून एमपीएससीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, एमपीएससी समन्वय समिती यांच्यासह राज्यभरातील उमेदवारांकडूव पाठपुरावा करण्यात येत होता.

एमपीएससीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आता वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे. त्यायबरोबर कोरोनाचा संसर्ग आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा फेरआढावा आयोगाकडून घेण्यात येईल. त्यानुसार संकेतस्थळावर माहिती जाहीर करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment