कोरोनाने बदलली जिमची व्याख्या, अशा प्रकारे वर्क आऊट करत आहेत लोक

कोरोना व्हायरसमुळे मागील 3-4 महिन्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. लॉकडाऊनमुळे जीवनावर देखील मोठा परिणाम झाला आहे. आता हळूहळू अनेक गोष्टी पुन्हा सुरू होत असताना या महामारीचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर पाहण्यास मिळत आहे. दुकानात जाण्यापासून ते जिमपर्यंत सर्वच ठिकाणी या व्हायरसमुळे एक भिती निर्माण झाली आहे. सोशल डिस्टेंसिंगसाठी जिम मालक देखील खास उपाय करत आहेत.

अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया येथे तर सोशल डिस्टेंसिंग पाळण्यासाठी चक्क जिममध्ये वर्कआउट पॉड्स बनविण्यात आले आहेत. शावर कर्टन्स अर्थात प्लास्टिकच्या पडद्याने हे पॉड्स बनविण्यात आले आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.

रिपोर्टनुसार, कॅलिफोर्नियाच्या रेडोंडो बीच येथील ‘इंस्पायर साउथ बे फिटनेस’चे मालक पिट सॅप्सिनने राज्याच्या दिशानिर्देशांचे पालन करत जिम उघडली आहे. त्यांनी सदस्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रत्येकासाठी प्लास्टिक वर्कआउट पॉड्स बनवले आहेत. यामुळे वर्कआउट दरम्यान मास्क लावण्याची देखील गरज पडत नाही.

View this post on Instagram

//INSPIRE GAINZ POD 🔰⁣ ⁣ Reopening our gym @inspiresouthbay is not an easy task. But we are prepared to increase the safety for all of our members against COVID-19 ⛔⁣ ⁣ It took us about 3 days to build our pods. We will have our sanitation and social distancing protocols in place when gyms are allowed to reopen. (no official date yet)⁣ ⁣ We will also continue to host ZOOM classes until we have a vaccination 💉 This effort is to accommodate our members who prefer to stay at home but still get a good workout if they are not ready to come back in person 😊⁣ ⁣ Our class capacity will be limited but we will get creative with our program. No matter what, we've got your back. 💯 🤓 #groupfitnessclasses #coreworkouts #hiit #igfitness #motivationalquote #TEAMINSPIRE #Inspiresouthbayfitness #hardwork #champion #redondobeach #manhattanbeach #hermosabeach #homeworkouts #correctmovements

A post shared by P E E T | F I T (@peetfit) on

पिटने इंस्टाग्रामवर या प्लास्टिक वर्कआउट पॉड्सचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

Leave a Comment