व्हॉट्सअ‍ॅपच्या या सेटिंगमुळे समोरच्या व्यक्तिला आपोआप जाईल रिप्लाय - Majha Paper

व्हॉट्सअ‍ॅपच्या या सेटिंगमुळे समोरच्या व्यक्तिला आपोआप जाईल रिप्लाय

व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरचा वापर केवळ चॅटिंग नाहीतर बिझनेस वाढवण्यासाठी देखील केला जातो. मोठ्या प्रमाणात लोक व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅपचा वापर लोक उद्योगाच्या वाढीसाठी करतात. या अ‍ॅपवर केवळ तुम्हाला प्रोफाईल, सामान, उद्योगाचा पत्ता आणि वेबसाईटची माहिती द्यावी लागते. यानंतर थेट व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ग्राहकांशी संपर्कात राहता येते. एवढेच नाहीतर ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी प्रत्येकवेळी व्हॉट्सअ‍ॅपवर जाण्याची देखील गरज नाही. याचे ऑटो-रिप्लायचे फीचर हे काम अगदी सोपे करते.

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅपमध्ये युजर्सला away messages चा एक पर्याय मिळतो. यात कोणताही मेसेज तुम्ही सेट करू शकता व हा मेसेज ऑटो-रिप्लाय पद्धतीने समोरील व्यक्तीला जाईल. याशिवाय away hours या पर्यायाद्वारे मेसेज किती वेळात जाईल ती वेळ देखील निश्चित करता येते.

असा करा या फीचरचा वापर –

  • सर्वात प्रथम व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये बिझनेस सेटिंग्स या पर्यायावर जा.
  • आता Away message वर जाऊन Send away message वर क्लिक करा. येथे तुम्हाला जो मेसेज ऑटो रिप्लाय म्हणून पाठवायचा आहे, तो टाकून ओके करा.
  • हा मेसेज किती वेळात जाईल यासाठी तुम्ही वेळ ठरवू शकता. यासाठी तुम्हाला तीन पर्याय मिळतील. तुम्ही दिर्घकाळ उपलब्ध नसाल तर Always send, ठराविक वेळेसाठी Custom schedule आणि उद्योग बंद असताना मेसेज पाठवण्यासाठी Outside of business hours हा पर्याय निवडू शकता.
  • ऑटो रिप्लाय कोणाकोणाला पाठवायचा आहे, हे देखील तुम्ही ठरवू शकता. यासाठी तुम्हाला Everyone, Everyone not in address book, Everyone except आणि Only send to हे 4 पर्याय मिळतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे पर्याय निवडू शकता.

Leave a Comment