अशोक चव्हाणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात; मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज


मुंबई: आज काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अशोक चव्हाण यांना २५ मे रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्यामुळे दाखल करण्यात आले होते. अशोक चव्हाण यांच्यावर तेव्हापासून उपचार सुरु होते. अखेर तब्बल आठवडाभरानंतर अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाची २४ मे रोजी अशोक चव्हाण यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर चव्हाण यांना रुग्णवाहिकेने नांदेडवरून मुंबईत आणण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर मंत्री योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठका किंवा इतर बैठका यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पाडल्या जात आहेत. तर प्रत्यक्ष होणाऱ्या बैठकीमध्येही कमी उपस्थिती आणि योग्य ते अंतर पाळले जात आहे. एवढे करूनही राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती.

Leave a Comment