शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा; भारतात नोव्हेंबर महिन्यातच दाखल झाला होता कोरोना


नवी दिल्ली – देशाभोवती कोरोनाने आवळलेला फार्स दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असतानाच शास्त्रज्ञांकडून या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ३० जानेवारी २०२० रोजी, केरळमध्ये कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची भारतात अधिकृत नोंद झालेली आहे. पण असे असले तरी २०१९च्या नोव्हेंबर महिन्यातच कोरोनाने देशात शिरकाव केला होता, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू झाल्याची माहिती ‘मोस्ट रिसेंट कॉमन एनसेस्टर’द्वारे (एमआरसीए) समोर आली आहे.

देशभरातील प्रमुख संस्थांमधील वरिष्ठ शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, ११ डिसेंबर २०१९ पर्यंत चीनमधील वुहान येथील कोरोनाचा मूळ विषाणू हा पसरत होता. शास्त्रज्ञांनी ‘एमआरसीए’ या तंत्राचा वापर करत अंदाज वर्तवला आहे की, २६ नोव्हेंबर आणि २५ डिसेंबर दरम्यान तेलंगणा व अन्य राज्यांमध्ये पसरत असलेल्या विषाणुची उत्पत्ती झाली होती. याची सरासरी तारीख ११ डिसेंबर मानली जात आहे. तर, चीनमधून ३० जानेवारी अगोदर आलेल्यांमुळे भारतात हा विषाणू पोहचला का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण, देशात त्या काळात कोरोनाच्या तपासण्या मोठ्याप्रमाणावर सुरू झालेल्या नव्हत्या.

केवळ कोरोना विषाणुच्या कालावधीचा अंदाज हैदराबादेतील ‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्यूलर बायोलॉजी’ (सीसीएमबी) च्या शास्त्रज्ञांसह अन्य शास्त्रज्ञांनी लावला आहे. तसेच, विषाणुच्या नव्या प्रजातीचा शोधही त्यांनी लावला आहे. जी सध्याच्या विषाणू पेक्षा वेगळी आहे. याला क्लेड I/A3i असे नाव संशोधकांनी दिले आहे. तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र व दिल्लीत मोठ्याप्रमाणावर या नव्या विषाणुचा संसर्ग होत आहे. चीनमध्ये या विषाणूची उत्पत्ती नाही झालेली तर दक्षिण-पूर्व आशियात झाल्याचेही समोर आले आहे.

Leave a Comment