जपानमधील ‘कोरोना आणीबाणी’ संपुष्टात


टोकियो – जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशातील कोरोना आणीबाणी संपुष्टात आल्याची घोषणा केली आहे. देशातील कोरोनाबाधित नव्या रुग्णांचे प्रमाण घटल्यामुळे कोरोना आणीबाणी आता संपुष्टात आणल्याचे शिंजो आबे यांनी म्हटले आहे. ही आणीबाणी उठवण्यासाठी आम्ही एक विशिष्ट धोरण आखले होते. देशात आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची घट झाल्यामुळे आता देशभरात आणीबाणीची गरज नसल्यामुळे ही आणीबाणी आम्ही देशपातळीवर उठवत असल्याचेही आबे यांनी म्हटले आहे. कोरोनाविरोधातील लढाई आमचा देश अत्यंत योग्य पद्धतीने लढत असल्यामुळे आमच्या देशात असलेली कोरोना आणीबाणी आम्ही संपवत असल्याचेही जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment