5 वर्षीय मुलाचा विमानाने दिल्ली ते बंगळुुरु एकट्याने प्रवास

कोरोना व्हायरसमुळे मागील दोन महिन्यात देशात लॉकडाऊन आहे. रेल्वे व विमानसेवा देखील बंद होती. मात्र आता सरकारने नियम शिथिल करत रेल्वे आणि विमानसेवा काही प्रमाणात सुरू केल्या आहेत. यामुळे विविध राज्यात अडकलेले लोक आपआपल्या घरी जात आहेत. विमानसेवा सुरू झाल्याने तब्बल तीन महिन्याने एका 5 वर्षीय मुलाची आपल्या आईशी भेट झाली आहे. हा मुलगा 3 महिन्यांपासून दिल्लीमध्ये अडकला होता.

विमानसेवा सुरू झाल्यानंतर दिल्लीवरून बंगळुरूच्या दिशेने उड्डाण घेणाऱ्या विमानाने 5 वर्षीय विहान शर्मा 3 महिन्याने बंगळुरूला आला आहे. बंगळुरू विमानतळावर त्याची आई त्याला घेण्यासाठी आली होती. त्यांनी सांगितले की, माझा 5 वर्षीय मुलगा तीन महिन्यांपासून दिल्लीमध्ये होता. आज तो विमानाने एकटा आला आहे.

एवढ्या लहान मुलांना विमानातून प्रवास करणे शक्य नाही. मात्र विहानचा स्पेशल कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आला होता. जेणेकरून तो आपल्या घरी जाऊ शकेल.

Leave a Comment