या देशात आधी कैद्यांवर करणार कोरोनावरील लसीचा प्रयोग

अन्य देशांप्रमाणेच कोरोना व्हायरसमुळे रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेतीन लाखांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभुमीवर आता रशियाच्या एका प्रमुख नेत्याने कोरोना व्हायरसवरील लसीची चाचणी कैद्यांवर करण्यात यावी असे म्हटले आहे. रशियाच्या प्रमुख नैत्यांपैकी एक असलेले व्लादिमीर झिरिनोवस्की म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या लसीची चाचणी लवकर व्हावी यासाठी कैद्यांवर त्याचा प्रयोग केला जावा. या बदल्यात गंभीर गुन्हा केलेल्या कैद्यांची शिक्षा अर्धी केली जावी.

Image Credited – Aajtak

झिरिनोवस्की म्हणाले की, मनुष्यावर चाचणीचा वेग वाढवायला हवा. मी तुम्हाला आश्वासन देतो की कारागृहात जे बंद आहेत, ते आनंदाने लसीच्या चाचणीसाठी तयार होतील. कारण यामुळे त्यांची शिक्षा अर्धी होईल.

Image Credited – Aajtak

झिरिनोवस्की लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते आहेत. मात्र त्यांच्या या प्रस्तावाचा विरोध होत आहे. कैद्यांच्या अधिकाऱ्यांसाठी काम करणारी संस्था Rossiya Sidyashchaya ने यावर म्हटले की, दोषींना गुराढोरांप्रमाणे वागवणे रशियामध्ये सामान्य आहे. मानवाधिकार परिषदचे सदस्य अलेक्झँडर ब्राँड यांनी देखील याचा विरोध केला आहे.

Leave a Comment