चीनचा दावा; कोरोना प्रतिबंधक लसीची 100 लोकांवर यशस्वी चाचणी


नवी दिल्ली – ज्या देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा जन्म झाला, आता त्याच चीनकडून कोरोना प्रतिबंधक लस बनवल्याची बातमी समोर आली आहे. या प्रतिबंधक लसीची चाचणी सुमारे 108 लोकांवर घेण्यात आली आहे. या चाचणी दरम्यान असे आढळले की कोरोनाच्या विषाणूविरूद्ध ही लस प्रतिकारशक्ती निर्माण करते. वैद्यकीय जर्नल द लान्सेटमध्ये चिनी लसीच्या चाचणी संदर्भातील हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून यासंदर्भात न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अनेक लॅबमध्ये संशोधकांनी या लसीचा अभ्यास केल्याचा दावा केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अमेरिकन कंपनी मॉडर्ना यांच्याआधी ही लस तयार झाल्याचेही समोर आले आहे. या चिनी लशीची मानवी चाचणी वर्षाच्या सुरूवातीस सुरू झाली होती. चिनी लशीचे काही दुष्परिणाम देखील पाहिले गेले असून या लसीमुळे कोणताही गंभीर धोका निर्माण झाला नाही.

चीनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार ही लस लागू झाल्यानंतर सुमारे 28 दिवसांनंतर त्या व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती सर्वाधिक होती. जगातील विविध देशांमधील वैद्यकीय शास्त्रज्ञांची सुमारे 100 लोकांची टीम सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनात गुंतले आहे. तर कोरोना प्रतिबंधक लसीची फायझर, बायोटेक आणि कॅनसिनो या कंपन्यांनी मानवी चाचणी सुरू केली आहे. अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाने गुरुवारी सांगितले की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस तयार करण्यासाठी अ‍ॅस्ट्रॅजेनेका या औषधी कंपनीला 1.2 अब्ज डॉलर्स पर्यंत अर्थसहाय्य दिले जाईल.

Leave a Comment