चीन, रशियापासून धोका, ट्रम्प करणार अणूचाचणी !

चीन आणि रशियापासून वाढता धोका लक्षात घेऊन अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे जवळपास 28 वर्षांनी अणूबॉम्ब चाचणी करण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेने या आधी 1992 मध्ये अणूचाचणी केली होती. अणूचाचणी संदर्भात अमेरिकेच्या सुरक्षा संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या चाचणीचा उद्देश आपल्या शस्त्रांची विश्वसनीयता तपासणे आणि नवीन डिझाईनचे शस्त्र बनविणे आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, संरक्षणसंबधी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की जर अमेरिकेने रशिया आणि चीनला दाखवून दिली की ते वेगाने चाचण्या करू शकतात, तर हे फायदेशीर ठरेल. अमेरिकेला शस्त्रांवरील नियंत्रणासाठी रशिया आणि चीनसोबत करार करायचा आहे.

ट्रम्प प्रशासनाने सांगितले की, ते नवीन शस्त्र निर्मितीचा विचार करत नसून रशिया आणि चीनने चर्चा करण्यास मनाई केल्यावर मात्र नवीन शस्त्र निर्मितीचा देखील अधिकार आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये अणूचाचण्यांबाबत एकमत झाले नाही. मात्र ट्रम्प प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रस्तावाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे अणूचाचण्यांना विरोध करणाऱ्या काही लोकांनी ट्रम्प प्रशासनाच्या या प्रस्तावावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अणुचाचणी इतर राष्ट्रांना देखील असे करण्यास प्रेरित करेल. यामुळे जगभरात अणुबॉम्बची शर्यतच सुरू होईल. दरम्यान, अमेरिकेकडे 3800 अणवस्त्रे आहेत. या अणवस्त्रांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे 800 मिसाईल्स आहेत.

Leave a Comment