मारुती सुझुकीने आपले लाईट कमर्शल व्हिकल सुपर कॅरीचे (Super Carry) बीएस-6 कम्प्लायंट एस-सीएनजी व्हेरिएंट लाँच केले आहे. मारुती सुपर कॅरी सीएनजी बीएस-6 ची एक्स शोरुम किंमत 5.07 लाख रुपये आहे. सुपर कॅरी देशातील पहिले लाईट कमर्शल व्हिकल (एलसीव्ही) आहे, ज्याला इंजिन बीएस-6 मध्ये अपग्रेड करण्यात आले आहे.
BS-6 मारुती ‘सुपर कॅरी’ दमदार मिनी ट्रक लाँच
मारुती सुझुकी सुपर कॅरीमध्ये 1,200सीसीचे बीएस-6 कम्प्लायंट ड्युल-फ्यूल पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000rpm वर 64 bhp पॉवर आणि 3,000rpm वर 85 Nm टॉर्क जनरेट करते. ही देशातील एकमेव LCV आहे, जी 5 लीटर पेट्रोल टँकसोबत ड्यूल-फ्यूल CNG व्हेरिएंटमध्ये येते.

मारुतीच्या या मिनी ट्रकमध्ये पॅसेंजर्सच्या सुरक्षेसाठी अनेक फीचर देण्यात आलेले आहेत. यात रिव्हर्स पार्किंग सेंसर्स, सीट बेल्ट रिमाइंडर, लॉक करण्यासाठी ग्लव बॉक्स आणि मोठ्या लोडिंग डेकचा समावेश आहे.

सुपर कॅरी मारुती सुझुकीचे सहावे बी-6 कम्प्लायंट एस-सीएनजी व्हिकल आहे. या आधी कंपनीने ऑल्टो, वॅग्नआर आणि आर्टिगा सारख्या कार्सचे बीएस-6 मॉडेल लाँच केले आहे.