कोरोनावरील लस येण्यासाठी अजून दोन वर्ष लागतील – जागतिक आरोग्य संघटना


वॉशिंग्टन – कोरोनावरील लस येण्यासाठी अजून दोन वर्ष लागतील, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या दरम्यान प्रत्येकाने कोरोनाशी जुळवून घेत जगायला शिकावे, असं आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. त्याचबरोबर भारताने कोरोनाविरोधात केलेल्या उपाययोजनांचे देखील जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष राजदूत डेव्हिड नाबारो यांनी एका मुलाखतीत बोलताना कौतुक केले.

कोरोनाशी जुळवून घेत भारतीय नागरिक जगू शकतो. कोरोनाला अशाच पद्धतीच्या जीवनशैलीने बाजूला ठेवता येऊ शकते. कोरोनाविषयी देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षित करणे हे संसर्गाची साखळी तोडण्यातील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे नाबारो म्हणाले आहेत. ज्या पद्धतीने भारताने कोरोनाची परिस्थिती हाताळली, त्यातून पुढील टप्प्याला यशस्वीपणे सामोरे जाण्याचा आत्मविश्वास त्यातून मिळाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जगाच्या तुलनेत कमी असल्याचे डेव्हिड नाबारो यांनी म्हटले आहे.

Leave a Comment