व्हिडीओ ; २००३ विश्वचषकादरम्यानचा सेहवागने सांगितलेला तो किस्सा खोटा !


भारत आणि पाकिस्तान या दोन देशात असलेले हाडवैर जग जाहिर आहे. त्यातच पाकिस्तानच्या बाजूने चालू असलेल्या कुरापतींना भारतीय लष्कर तोंडघशी पडतात, हे आपण अनेकदा ऐकले आहे. जसे भारतीय लष्करातील जवान पाकिस्तानला सडेतोड उत्तर देतात, त्याचप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात भारतीय खेळाडू देखील पाकिस्तानबाबत दया माया दाखवत नाही. याचा अनुभव आतापर्यंत झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये घेतला आहे. त्यातच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याला खोटारडा म्हणून संबोधले आहे.

त्यामागे कारण देखील तसेच आहे. २००३ सालची विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत पार पडली. यास्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या सलामीवीर जोडीने पाकिस्तानी गोलंदाजांची केलेली येथेच्छा धुलाई केली होती. त्यातच सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर मारलेला अप्रतिम षटकार हा त्या स्पर्धेत चर्चेचा विषय ठरला होता. त्या सामन्याची क्षणचित्रे आजही क्रिकेट प्रेमी आवडीने सोशल मीडियावर पाहत असतात. पण त्या स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पराभवाचा सामना सहन करावा लागला, तरीही भारत-पाक सामन्यात शोएब आणि सेहवागमध्ये गाजलेले द्वंद्व आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल.

दरम्यान वीरेंद्र सेहवागने अनेक मुलाखती व टिव्ही कार्यक्रमात या सामन्यात शोएब अख्तरने आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी त्याला बाप बाप होता है, बेटा बेटा होता है असे म्हटल्याचे सांगितले होते. परंतू हॅलो अ‍ॅपसाठी पत्रकार विमल कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत शोएब अख्तरने सेहवागचा हा दावा फेटाळून लावत, मला जर मैदानात कोणी असे बोलले असते तर मी त्याला कधीही सोडले नसते अशा शब्दांत वीरेंद्र सेहवागने सांगितलेली गोष्ट घडलीच नसल्याचे शोएब अख्तरने म्हटले आहे.

Leave a Comment