दमदार फीचर्ससह रियलमीचे स्वस्त दोन स्मार्टफोन भारतात लाँच

रियलमीने आपले दोन नवीन स्मार्टफोन नार्झो 10 आणि नार्झो 10ए भारतात लाँच केले आहेत. 26 मार्चला हा फोन लाँच होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे उशीर झाला. दोन्ही स्मार्टफोनमध्ये दमदार 5000एमएएच बॅटरी देण्यात आलेली आहे.

किंमत –

रियलमी नार्झो 10 स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन थॅट ग्रीन आणि थॅट व्हाईट रंगात उपलब्ध आहे. दुसरीकडे रियलमी नार्झो 10ए स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे. हा फोन सो ब्लू आणि सो व्हाइट रंगात मिळेल.

Image Credited – NDTV

फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाईटवर या स्मार्टफोनची विक्री होईल. रियलमी नार्झो 10 ची 18 मेला दुपारी 12 वाजल्यापासून विक्री सुरू होईल. तर रियलमी नार्झो 10ए स्मार्टफोनची 22 मे पासून विक्री सुरू होईल.

रियलमी नार्झो 10 स्मार्टफोनचे फीचर्स –

ड्युअल सिम (नॅनो) रियलमी नार्झो 10 स्मार्टफोन अँड्राईट 10 वर आधारित Realme UI वर काम करतो. फोनमध्ये 6.5 इंच फुल एचडी स्क्रीन (720 x 1600 पिक्सल्स) आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसर देण्यात आले आहे. प्रोसेसरचा अधिकतम क्लॉक स्पीड 2 गीगाहर्ट्ज़ आहे. ग्राफिक्ससाठी यात माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे.

Image Credited – NDTV

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. यात 48 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा देण्यात आला असून, 8 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा व इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे देण्यात आलेले आहेत. सेल्फीसाठी यात फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ए-जीपीएस आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे. याशिवाय एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटरआणि और प्रॉक्सिमिटी सेंसर या फोनचा भाग आहे.फोन मागील बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. सोबतच यात मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळेल. फोनमध्ये 18 वॉट क्विक चार्ज सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी देण्यात आलेली आहे.

Image Credited – NDTV

रियलमी नार्झो 10ए स्मार्टफोनचे फीचर्स –

रियलमी नार्झो 10ए स्मार्टफोन अँड्राईड 10 वर आधारित रियलमी यूआयवर काम करतो. यात 6.5 इंच एचडी+ (720×1600 पिक्सल) वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन 89.8 प्रतिशत स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसोबत येतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी70 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Image Credited – NDTV

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 3 रियर कॅमेरा देण्यात आले आहे. प्रायमेरी कॅमेरा 12 मेगापिक्सल असून, इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहे. तर सेल्फीसाठी फ्रंटला 5 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. कॅमेऱ्यामध्ये एचडीआर, एआई ब्यूटीफिकेशन, पनोरमा व्यू आणि टाइम-लॅप्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. इतर कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि बॅटरी रियलमी नार्झो स्मार्टफोन प्रमाणेच आहे.

Leave a Comment