जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ


मुंबई : कोरोना या जीवघेण्या व्हायरसचा कहर जगभरातील 212 देशांमध्ये कायम असून देशभरात मागील 24 तासात 79,875 नवीन कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तर कोरोनामुळे 24 तासात 3,510 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 2 लाख 83 हजार 734 जणांनी आपले जीव गमावले आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 42 लाखांजवळ गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 14 लाख 90 हजार 444 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 30 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेतील 13,67,638 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर कोरोनामुळे 80,787 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे 31,855 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,19,183 एवढी झाली आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 26,621 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,64,663 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 30,560 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,19,070 एवढा झाला आहे.

जगभरात जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर कोरानामुळे अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 80 हजारांवर गेला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौदाव्या स्थानावर भारतात आत्ता कोरोनाचे 67 हजार 161 रुग्ण तर 2212 बळी कोरोनामुळे गेले आहेत.

Leave a Comment