राज्यात हजारच्या पटीत कोरोनाग्रस्तांची वाढ; एकूण रुग्णसंख्या 22 हजार 171


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सलग पाचव्या दिवशी हजाराच्या पटीत वाढ झाली असून काल दिवसभरात 1278 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. परिणामी राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजार 171 झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे काल दिवसभरात सर्वाधिक 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान दिलासादायक म्हणजे काल 99 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 4199 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 38 हजार 766 नमुन्यांपैकी 2 लाख 15 हजार 903 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 22 हजार 171 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 44 हजार 327 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 14 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 53 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 832 झाली आहे.

Leave a Comment