जगाची चिंता वाढवणारी बातमी; वुहानमध्ये कोरोनाची वापसी


बीजिंग – जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. पण ज्याठिकाणी या जीवघेण्या व्हायरसचा उगम झाला त्या चीनमध्ये मागील एका महिन्याभरापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. पण आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील माहिती चीनमधील हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली असून कोरोनाचा रुग्ण चीनमधील वुहानमध्ये सापडला असून अन्य ठिकाणी १४ नवे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे.

या ठिकाणी ३ एप्रिलनंतर एकाही व्यक्तीत कोरोनाची लक्षणे सापडल्याची माहिती समोर आली नव्हती. पण आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. गुरूवारी सर्वच क्षेत्र कमी धोक्याची क्षेत्र असल्याची घोषणा चीनने केली होती. त्यानंतर चीनच्या उत्तरपूर्व जिनिल प्रांतातील शुलान या शहरात रविवारी ११ कोरोनाग्रस्त आढळून आले. त्यापूर्वीही एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान या घटनेनंतर चीनने शुलान या शहराला प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीत टाकले आहे.

१४ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद चीनमध्ये करण्यात आली आहे. त्यापैकी २ रुग्ण हे शांघायमध्ये आढळले आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १४ पैकी ११ रुग्ण हे जिनिल प्रांतातील, शांघायमधील तर १ एक हुबेई प्रांतातील असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चीनमध्ये ८२ हजार ९०१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार ६३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment