कोरोना : शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता ठरू शकते मृत्यूला कारणीभूत

कोरोना व्हायरस संबंधी झालेल्या नवीन संशोधनात व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि कोरोनाग्रस्तांचा संबध असल्याचे समोर आले आहे. यूरोपमधील 20 देशांच्या आकडेवारीवरून हे समोर आले आहे. या सदंर्भातील संशोधन ब्रिटनच्या अँग्लिया रस्किन यूनिव्हर्सिटी आणि क्वीन एलिजाबेथ हॉस्पिटल किंग्स लायन एनएचएस फाउंडेशन ट्रस्टच्या वैज्ञानिकांनी संशोधन केले असून, हे संशोधन जर्नल अँगिंग क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे.

व्हिटॅमिन डी हे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना प्रभावित करत असते. त्यांना सायटोकाइन वाढविण्यापासून रोखते. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसची लागण झाल्यास सायटोकाइन वेगाने वाढू लागते.

अभ्यासात समोर आले की, इटली आणि स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे. येथे अधिकांश उत्तर यूरोपियन देशांच्या तुलनेत सरासरी व्हिटॅमिन डीचा स्तर कमी आहे. यामागचे कारण म्हणजे दक्षिण युरोपमधील खासकरून वृद्ध लोक सुर्याचा प्रकाश घेत नाहीत. दर उत्तर यूरोपमधील लोकांमध्ये सरासरी व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात आढळतो. याचे कारण म्हणजे हे लोक कॉड लिव्हर ऑईल (एक प्रकारच्या माशाचे तेल) आणि व्हिटॅमिन डी स्प्लेमेंट्स घेतात.

डॉ. ली स्मिथ म्हणाल्या की, आम्हाला व्हिटॅमिन डी आणि कोव्हिड-19 च्या केसेसमध्ये एक विशिष्ट संबंध आढळला. खासकरून मृत्यू दरात. श्वसन संबंधी समस्येवर व्हिटॅमिन डी परिणामकारक ठरते. सोबतच कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला घटक म्हणजेच वृद्धांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी दिसते.

Leave a Comment