गर्दी टाळण्यासाठी राज्यात मद्य विक्रीसाठी आता टोकन पद्धत


मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरु असलेला लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवल्यानंतर जीवनावश्यक नसलेल्या पण महसूलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेली मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यास राज्य सरकारने सशर्त परवानगी दिली होती. पण, मद्य विक्रीच्या दुकानांसमोर पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे राज्य सरकार समोर ही गर्दी टाळण्याचा प्रश्न सरकार निर्माण झाला होता. सरकारने आता त्यावरही मार्ग काढला असून, राज्यात आता टोकन पद्धतीने मद्य विक्री केली जाणार असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यासाठीची नियमावली जारी केली आहे.

केंद्र सरकारने ३ मे नंतर लॉकडाउनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर जीवनावश्यक आणि जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकाने या काळात उघडण्यास शिथिलता देण्यात आली होती. यासंदर्भात रविवारी राज्य सरकारनेही आदेश जारी केले होते. मद्य विक्रीसह इतर जीवनावश्यक नसलेल्या एकल दुकानांना सुरू करण्यास त्यात परवानगी देण्यात आली होती. पण जास्त गर्दी मद्य विक्रीच्या दुकानांसमोर होत असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी सरकारने टोकन पद्धती आणण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी असेल दारू विक्रीची टोकन पद्धती

त्याचबरोबर हे सर्व करताना सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे काटेकोटरपणे पालन करण्यात यावे. मद्य विक्रेत्यांनी यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. त्याचबरोबर राज्याच्या प्रत्येक विभागातील जवान, सहायक दुय्यम निरीक्षकांनी सोशल डिस्टसिंग आणि गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी, असे विभागीय आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे.

भरारी पथक गर्दी होणाऱ्या विशिष्ट भागातील पाहणीसाठी नेमण्यात यावे. त्याचबरोबर मद्य विक्रीच्या दुकानांसमोरील परिस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना उप विभागीय आयुक्त आणि अधीक्षकांनीही कराव्यात, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिले आहेत.

Leave a Comment