राज्य सरकारचा निर्णय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी


मुंबई : लॉकडाऊनमधील नियमांमध्ये राज्य सरकारने बदल केला असून रेड झोनमध्येही काही अनावश्यक सामान विक्रीच्या (नॉन इसेन्शियल) दुकानांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. आता त्यानुसार मुंबई, पुण्यात देखील वाईन शॉप सुरू होणार आहेत. पण, मॉल, हॉटेल, रेस्टोरेंट्समध्ये दारू मिळणार नाही. या पूर्वीच्या नियमावलीनुसार रेड झोनमध्ये जीवनावश्यक गोष्टी वगळता इतर कोणत्याही विक्रीला परवानगी नव्हती. सरकारने यात आता शिथिलता आणली आहे. पण, यासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील झोननुसार केंद्र आरोग्य मंत्रलयाने जिल्ह्याची यादी जाहीर केल्यानंतर राज्यानेही झोन निहाय जिल्ह्यांची यादी जाहीर केली. पण, केंद्राच्याच यादीवर राज्यानेही शिक्कामोर्तब केलेले दिसून येत आहे. शनिवारी राज्य सरकारने कुठल्या झोननुसार काय सुरू होणार याची नियमावली जाहीर केली होती. सरकारने आता या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. यानुसार आता रेड झोन मधील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात काही अनावश्यक (नॉन इसेन्शियल) दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

 • काय आहे राज्य सरकारची नवीन नियमावली
 • रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात अनावश्यक (नॉन इसेन्शियल) दुकानांना परवानगी.
 • स्पा, सलून, याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही.
 • एका लेनमध्ये फक्त पाच दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
 • राज्यात मुंबई, पुणे शहरातही वाईन शॉप सुरू राहणार.
 • सर्व दुकानदार आणि ग्राहकांनी सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे.
 • मॉल, हॉटेल्स, रेस्टोरेंट्समध्ये दारू मिळणार नाही.
 • अत्यावश्यक दुकाने सगळी सुरू राहणार, त्यात बदल नाही.

काल राज्य सरकारने झोननुसार जारी केलेली नियमावली

 • रेड झोनमधील 14 जिल्हे – मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, सातारा, पालघर, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, यवतमाळ.
 • बस, रिक्षा, टॅक्सी बंद राहणार
 • सलून बंद राहणार
 • ग्रामीण भागातील सर्व दुकाने नियम पाळून खुली करण्याचा निर्णय
 • पण ग्रामीण भागातील मॉल सुरू होणार नाही
 • रेड झोनमधील महापालिका क्षेत्र मुंबई, MMR, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव वगळून इतर शहरांमधील सर्व
 • प्रकारची दुकान सुरू होणार
 • वरील महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
 • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार, त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित

 

 • ऑरेंज झोनमधील 16 जिल्हे – रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, अहमदनगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, परभणी, नंदूरबार.
 • बस वाहतूक बंद राहणार
 • टॅक्सी, रिक्षा सेवा सुरू होणार
 • एक वाहक आणि दोन प्रवासी अशी परवानगी
 • खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
 • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार, त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित
 • अत्यावश्यक सेवांसह आता इतर दुकान सुरू होणार (मॉल सोडून)

 

 • ग्रीन झोनमधील 6 जिल्हे – सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशिम, वर्धा, गडचिरोली.
 • सगळे सुरु करायला परवानगी
 • 50 टक्के प्रवासी क्षमतेने ग्रीन झोनमध्ये बस सेवा सुरू होणार
 • बसच्या फेऱ्या ग्रीन झोनमध्येच असणार त्याच्या क्षेत्राबाहेर बस जाणार नाही
 • खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
 • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार
 • तर त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित

 

Leave a Comment