मुंबई : बृह्नमुंबई महानगर पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातील कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांपैकी 50 टक्के उपस्थित राहण्याबाबतचे 20 मार्च 2020 रोजीचे आदेश रद्द करून 100 टक्के उपस्थित राहण्याचे नवीन आदेश देण्यात येत आल्याचे परिपत्रक 30 एप्रिल 2020 रोजी जारी केले आहे. त्वरीत त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
अत्यावश्यक सेवा वगळता जे कामगार, कर्मचारी पनवेल, बदलापूर, आसनगाव, वसई इत्यादी किंवा पुढे राहत असतील त्यांनी महापालिकेच्या हद्दीतील निकटच्या विभाग कार्यालयांमध्ये सेवा द्यावी, असे आयुक्तांच्या स्वाक्षरीने सामान्य प्रशासनाने जारी केलेल्या या परिपत्रकामध्ये निर्देश दिले आहे. त्यामुळे विभाग कार्यालयांनी अतिरिक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांची सेवा कोरोना संदर्भातील उपाययोजनासंबंधी वापरावी आणि त्याचा हजेरीचा अहवाल दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या मूळ खात्याला अथवा विभागाला कळवावे, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/01160403/f2.jpg
प्रशासनाला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आवश्यकता भासल्यास कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असेल त्याचबरोबर जे कर्मचारी व अधिकारी प्रशासनाने कळवल्यानंतरही कार्यालयात उपस्थित राहणार नाहीत, ते विना परवानगी अनुपस्थित राहतील त्यांना स्मरणपत्रे पाठवावी. ते त्यानंतरही कर्तव्यावर येत नसतील तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश या परिपत्रकाद्वारे आयुक्तांनी दिले आहेत.
https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/01160355/f3.jpg
खातेप्रमुख किंवा विभागाने उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्यास त्यानुसार कार्यालयांमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक असेल असेही यात नमूद केले आहे. मुंबई महापालिकेच्या 55 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना जर मधुमेह, उच्च रक्तदाब, डायलिसिस अशा स्वरुपाचे आजार असल्यास त्यांना पुढील 15 दिवस सुट्टी राहणार आहे. पुढील 15 दिवस त्यांना कर्तव्यावर उपस्थित राहण्यास प्रशासनाने सूट दिलेली आहे. पण कोणतेही आजार नसलेल्या 55 वर्षे किंवा त्यापुढील कर्मचारी तथा अधिकाऱ्यांना तसेच डॉक्टर्स यांना कोरोनाग्रस्त असलेल्या ठिकाणी नेमणूक न करण्याचेही निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.