काँग्रेस आमदाराचा जावईशोध; दारुमुळे होईल कोरोनाचा नायनाट


जयपूर – राजस्थानमधील सांगोद मतदारसंघातील कॉंग्रेस आमदार भरतसिंग कुंदनपूर यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र लिहून लॉकडाऊन दरम्यान राज्यातील दारूची दुकाने पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली. दारूची दुकाने न उघडल्यामुळे अवैध दारू व्यवसाय व विक्री वाढत असल्याची चिंता कॉंग्रेस आमदाराने आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदाराने लिहिले आहे की, दारूची दुकाने न उघडल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे आणि यामुळे राज्यभर बेकायदेशीर दारू तयार केली आणि विकली जात आहे. सिंह पुढे म्हणाले की अल्कोहोलने हात धुवून कोरोना विषाणू स्वच्छ करता येतो, तर मद्यपान केल्याने घशातून विषाणू नक्कीच साफ होईल. म्हणून सरकारने दारूची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.


ते म्हणाले की लॉकडाऊनमुळे बाजारात दारूची मागणी जास्त आहे, त्यामुळे मद्यपान करणारे त्याचे स्वागत करत आहेत. दारू विक्री बंद असल्यामुळे सरकार तोट्यात जात आहे, तर मद्यपान करणार्‍यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

आमदारांनी पत्रात राज्याच्या बातम्यांचा उल्लेख केला आहे, ज्यात पहिली बातमी भरतपूर जिल्ह्यातील असून तेथील हैलाना गावातील दोन जणांची बेकायदा देशी दारु पियाल्यामुळे डोळ्यांची दृष्टी गेली आहे, तर दुसरी बातमी म्हणजे लॉकडाऊन दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारने एक्साईज ड्युटी वाढविणे बाबत होती.

ते म्हणाले की, सन 2020-21 मध्ये राज्य सरकारने दारु विक्रीतून 12,500 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचमुळे सरकारने उत्पादन शुल्क वाढवण्याची शक्यता आहे. सरकारने दारूची दुकाने उघडली तर बरे होईल. मद्यपान करणार्‍यांना मद्य मिळेल आणि सरकारलाही महसूल मिळेल. यापूर्वी हनुमानगड जिल्ह्यातील भद्रा भागातील आमदार बलवानसिंग पुनिया यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लॉकडाऊन दरम्यान दारूची दुकाने उघडण्याचे आवाहन केले होते.

Leave a Comment