आता सर्व कार्ड व्यवहार होणार ‘कॉन्टॅक्ट फ्री’

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील पेमेंट नेटवर्क व्हिसा, मास्टकार्ड आणि एनपीसीआय या कंपन्यांना कार्ड पेमेंटद्वारे प्रत्येक व्यवहारासाठी टॅप अँड गो फंक्शनचा वापर करण्याचा परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या काळात व्यवहार सुरक्षित आणि कॉन्टॅक्ट फ्री व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

बँक आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाईड्सने अपग्रेड दिल्यानंतर ग्राहक डेबिट-क्रेडिट कार्ड स्वाईप न करता, कॉन्टॅक्ट फ्री व्यवहार करू शकतात. 2000 रुपयांच्या वरील व्यवहारासाठी देखील ही सुविधा असेल.

मात्र टॅप अँड गो कार्ड पेमेंट सेवा वापरताना 2000 रुपयांच्या पुढील व्यवहारासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि पिन द्यावा लागेल. टॅप अँड गो व्यवहार रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीच्या माध्यमातून काम करते व यासाठी शारिरिक संपर्काची गरज नसते. याशिवाय ग्राहके जेथे उपलब्ध आहेत, तेथे आधीप्रमाणेच कार्ड स्वाईप करून व्यवहार करू शकतात.

एनपीसीआय आपल्या ग्राहकांना कॉन्टॅक्टलेस पेमेंट्साठी जागृक करत आहे. तर मास्टरकार्ड्च्या कॉन्टॅक्टलेस पेमेंटमध्ये या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सॅमसंग, अ‍ॅपल, पाईन लॅब आणि वर्ल्डलाईन देखील पीओएस डिव्हाईस आणि स्मार्टफोनमध्ये व्हर्च्युअल डेबिट कार्ड सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment