दिलासादायक…! जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या आणि मृत्यूच्या आकड्यात होत आहे घट


मुंबई : कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची जगभरातील संख्या 2 लाख सहा हजारांच्या वर पोहोचली असून कोरोनाचे 73,859 नवे रुग्ण मागील 24 तासात सापडले आहेत. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे 2 लाख 6 हजार 969 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 29 लाख 94 हजार 352 वर पोहोचली आहे. तसेच जगभरातील 8 लाख 78 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात मागील 24 तासात 73859 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर मागील 24 तासात जगात 3751 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा जगभरातील 210 देशांमध्ये कहर कायम आहे.

मागील 24 तासात जगभरात कोरोना संसर्ग आणि मृत्यूंच्या आकड्यांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात काल 24 तासात 90,731 नवीन कोरोनाग्रस्त सापडले होते. तर त्याआधी दिवसाला सरासरी एक लाख कोरोनाबाधित सापडत होते. तर कालच्या आकडेवारीनुसार त्याआधीच्या 24 तासात जगात 6,069 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर मागील 24 तासात 73859 नवीन कोरोनाग्रस्त जगभरात सापडले आहेत. तर मागील 24 तासात मृत्यूचा आकडा देखील कमी झाला असून जगात 3751 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथे 20 हजाराहून अधिक बळी कोरोनामुळे गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 50 हजारांहून अधिक बळी गेले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 9,87,160 कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 55413 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये 23910 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील 2,26,629 लोकांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 26,644 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 1,97,675 एवढा आहे.

Leave a Comment