जग कोरोनाशी लढत असताना चीनचा समुद्रात ‘पॉवर गेम’

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना दुसरीकडे चीन पॉवर गेम खेळताना दिसत आहे. चीन दक्षिण चीन समुद्रावर जबरदस्ती कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मागील रविवारी दक्षिण चीन समुद्राच्या 80 जागांची नावे बदलण्यात आली आहेत.

यातील 25 बेट आणि रीफ्स आहेत, तर इतर 55 समुद्रच्या खालील भौगोलिक स्ट्रक्चर आहेत. चीन याद्वारे 9-डॅश लाईनच्या भागावर कब्जा करत आहे. ही लाईन आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेकायदेशीर मानली जाते. कोरोना व्हायरसकडे दुर्लक्ष करत चीन या भागात आपले प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार,  आपल्या शेजाऱ्यांच्या बाबतीत चीनची भूमिका आक्रमक आहे. चीनची दुटप्पी भूमिका सर्वांसमोर येत आहे.

दक्षिण चीन समुद्रावर अधिकाऱ्यावर दाखवण्यावरून काही दिवसांपुर्वी व्हिएतनामने संयुक्त राष्ट्राकडे चीनविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चीनच्या जहाजांनी व्हिएतनामच्या जहाजांना धडक मारत बुडवले होते. यावरून फिलीपाईन्स, अमेरिका यांनी देखील चीनवर टीका केली होती.

यावर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो म्हणाले की, चीन महामारीकडून लक्ष हटवण्यासाठी अशी हरकत आहे. जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील चीनचा विरोध केला होता. चीनने पुर्व चायना सी मधील सेनकाकू बेटाजवळ जपानच्या समुद्र सीमेत आपले जहाज पाठवले होते. याला उत्तर म्हणून अमेरिकेचे जहाज तायवानच्या जलडमरूमध्यमधून गेले होते. चीनला नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा असे केले आहे.

भारताला धोका ?

चीनने तायवानला घाबरविण्यासाठी समुद्रात एअरक्राफ्ट कॅरियर उतरवले होते. मलेशियाच्या ऑईल शिप्सला देखील धमकवण्यात येत होते. ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशनचे अभिजीत सिंह यांच्यानुसार, भारताने हे लक्षात घ्यावे की साउथ चायना सीवर चीनने प्रभुत्व मिळवल्यास बेटाच्या आउटपोस्टचा वापर पुर्व हिंद महासागरात सैन्य शक्ती वाढवण्यासाठी करेल.

Leave a Comment