एटीएमद्वारे पसरू शकतो कोरोना, पैसे काढताना अशी घ्या काळजी

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुजरातमध्ये एटीएमद्वारे 3 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Image Credited – Aajtak

घराच्या बाहेर पडताना सॅनिटायझरसोबत ठेवा. बाहेर पडल्यावर जर एखाद्या गोष्टी स्पर्श केल्यास त्वरित सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.

Image Credited – Aajtak

एटीएममध्ये जर एखादी व्यक्ती आधीच असेल तर ती व्यक्ती बाहेर आल्यानंतरच आत जावे.

Image Credited – Aajtak

आपल्या सोबत वेट वाइप्स आणि टिश्यू पेपरसोबत ठेवा. एटीएमच्या रांगेत उभे असताना चेहरा, नाकाला स्पर्श करणे टाळा. रांगेतील लोकांपासून 1 मीटरचे अंतर ठेवा.

Image Credited – Aajtak

एटीएममध्ये कोणत्याही इतर वस्तूंना स्पर्श करू नका. चुकीने एखाद्या गोष्टीला स्पर्श केल्यास सॅनिटायझर वापरा.

Image Credited – Aajtak

एटीएमच्या रांगेत उभे असताना ओळखीची व्यक्ती भेटल्यास तिच्याशी हात मिळवणे टाळा व त्याऐवजी नमस्कार करा.

Image Credited – Aajtak

सर्दी-खोकला असल्यावर घराच्या बाहेर पडू नका. एटीएमच्या रांगेत उभे असताना शिंक आल्यास रुमालाने चेहरा झाका.

Image Credited – Aajtak

वापरलेले टिश्यू अथवा मास्क एटीएमच्या जवळील कचऱ्यात फेकू नये. यामुळे दुसऱ्यांना संक्रमण होऊ शकते.

Image Credited – Aajtak

याशिवाय गरज नसल्यास एटीएममध्ये न जाता सर्व व्यवहार ऑनलाईनच करावे.

Leave a Comment