या कंपनीच्या गेमिंग टुर्नामेंटमध्ये सहभागी व्हा आणि जिंका लाखो रुपये

तायवानची टेक्नोलॉजी कंपनी आसुसने ‘बॅटल ऑफ गॉड्स’ गेमिंग टुर्नामेंटची घोषणा केली आहे. बॅटल ऑफ गॉड्स ही ऑनलाईन विकली टुर्नामेंट आहे. हे टुर्नामेंट 24 एप्रिल 2020 पासून सुरू होत आहे.

या टुर्नामेंटमध्ये कंपनीच्या आरओजी सीरिजचे युजर्स भाग घेऊ शकतात. या बॅटलमध्ये विजेत्याला कंपनीकडून मोठे बक्षीस मिळणार आहे.

टुर्नामेंटचा पहिला सीझन 12 आठवडे चालेल. या दरम्यान स्पर्धकांना एकमेकांमध्ये पबजी गेम खेळावी लागेल व जिंकणाऱ्याला बक्षीस मिळेल. या स्पर्धेची एकूण बक्षीस 6,60,000 रुपये आहे.

हाय-अँड गेमिंगमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. दर शुक्रवारी आरओजी फोन युजर्स मल्टीप्लेयर रॉयल गेममध्ये कस्टम रुम्सचा भाग होतील व पबजीच्या बॅटल ग्राउंडवर उतरतील. टॉप स्पर्धकांना फायनल सामन्याचा हिस्सा बनवले जाईल आणि त्याचे लाईव्ह प्रेक्षपण होईल.

अंतिम क्लॅश विजेते दर आठवड्याला घोषीत केले जातील. त्यांना 6.60 लाख रुपये बक्षीस रक्कमेतील त्यांचा हिस्सा मिळेल. युजर्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बॅटल ऑफ गॉड्स सेक्शनमध्ये स्वतःला रजिस्टर करू शकतात. या इव्हेंटला कंपनीच्या युट्यूब चॅनेलवर देखील पाहता येईल.

Leave a Comment