युट्यूब झाले 15 वर्षांचे, तुम्ही पाहिला का पहिला व्हिडीओ ?

जगातील सर्वात मोठा व्हिडीओ प्लॅटफॉर्म युट्यूब आज 15 वर्षांचा झाला आहे. आजच्या दिवशी 24 एप्रिल 2005 ला युट्यूबवर पहिला व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ कंपनीचे सह-संस्थापक जावेद करीमने अपलोड केला होता.

या व्हिडीओमध्ये जावेद सॅन डियागोच्या एका प्राणी संग्रहालयात दिसत आहेत. हा व्हिडीओ 18 सेंकदांचा असून, जावेदचा मित्र याकोव लापित्सकीने या व्हिडीओला रेकॉर्ड केले होते. हा व्हिडीओ ‘Me at the Zoo’ नावाने अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओला आतापर्यंत 9 कोटींपेक्षा अधिकवेळा पाहण्यात आले आहे.

युट्यूबची सुरूवात चँड हर्ले, स्टिव्ह चेन आणि जावेद करीम यांनी केली होती. नोव्हेंबर 2006 मध्ये गुगलने युट्यूबला 1.65 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केले होते.

सध्या 88 देश आणि 76 भाषांमध्ये युट्यूबवरील व्हिडीओ पाहिले जातात. दर मिनिटाला या प्लॅटफॉर्मवर 400 तासांचे व्हिडीओ अपलोड होतात. याशिवाय युट्यूबने जाहिरातींद्वारे 2019 मध्ये 15.15 बिलियन डॉलर्सची कमाई केली आहे.

Leave a Comment