नागपूकरांची धाकधूक वाढली, कोरोनाग्रस्तांची शंभरी पार


नागपूर : नागपूरकर जीवघेण्या कोरोनाची साखळी तोडण्यात अपयशी ठरत असल्यामुळे तेथील कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभरी पार झाला आहे. नागपूरात आज आणखी दोन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. दरम्यान एम्समध्ये ५२ पुरुषांचा रिपोर्ट तर निरीच्या प्रयोग शाळेत ५० वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान, नागपूरमधील सतरंजीपूरा हा परिसर कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. याठिकाणच्या १५० जणांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.

तब्बल ५६ रुग्ण सतरंजीपुरा आणि आजूबाजूच्या परिसरात आढळले आहेत. त्यातच आता १५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. नागपुरात पुन्हा एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. मोमीनपुरा परिसरातील ५२ वर्षीय पुरुष कोरोना संक्रमित असल्याचे चाचणी अहवालामध्ये समोर आले आहे. संबंधित रुग्ण आधीच आमदार निवासात क्वारांटाईन होता. दरम्यान, तो जबलपूरच्या काही मरकजमधून परतलेल्या कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यालाही कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी नागपुरात एकूण संक्रमित रुग्ण संख्या ९९ झाली होती.

त्याआधी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागपुरात कोरोना बधितांच्या वाढत असलेल्या संख्येला जबाबदार असल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला होता. आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. कोरोना आजारावर मात करण्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शन तत्वानुसार आम्ही काम करत आहोत, त्यामुळे या आरोपात काही तथ्य नसल्याचे सांगत त्यांनी हे आरोप खोडून काढले आहे.

Leave a Comment