झोमॅटो आणि अर्बन कंपनीने केले आरोग्य सेतू अ‍ॅप वापरणे अनिवार्य

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आणि अर्बन कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. कोरोनाग्रस्तांना ट्रॅक करण्यासाठी सरकारने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आरोग्य सेतू अ‍ॅप लाँच केले आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी देखील या अ‍ॅपचे कौतूक केले आहे.

झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ट्विट करत सांगितले की, कंपनीने सर्व कर्मचारी आणि डिलिव्हरी पार्टनर्सला आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य केले आहे. जेणेकरून कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याची माहिती त्यांना मिळेल.

त्यांनी सांगितले की, याचा उद्देश जर कोणी कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आले असेल तर पुढील प्रसार रोखण्यासाठी याद्वारे आधीच माहिती मिळेल. यामुळे आमच्या ग्राहकांना देखील ऑर्डर देण्याचा विश्वास मिळेल.

तसेच इलेक्ट्रिशियन, कारपेंटर्स, प्लंबर्स आणि क्लिनर्स अशा सेवा पुरवणारी कंपनी अर्बनने देखील आपले कर्मचारी आणि भागीदारांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे.

अर्बन कंपनीचे सह-संस्थापक अभिराज बहल यांनी सांगितले की,  कंपनी सहा मुख्य सुरक्षा प्रोटोकॉल निश्चित केले आहेत. यामध्ये दररोज तपासणी, मास्क आणि हातमोजे घालणे, टूल्स आणि पृष्ठभागाचे सॅनिटायझेशन, पाउच आणि आजारी असल्यास सुट्टी याचा समावेश आहे.

Leave a Comment